• पालिकेची कारवाई : अनधिकृत टपऱ्या हटवल्या

पिंपरी  (प्रतिनिधी)- अत्यंत वर्दळीच्या पिंपरी चौकातील बेकायदेशीर टपऱ्यांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज (मंगळवारी) धडक कारवाई केली. पीएमपीएमलचे पास केंद्र, बेकायदेशीर टपऱ्या भुईसपाट केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे.

नेहरुनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर डाव्या बाजूला मोठ्या प्रमाणात टपऱ्या, बेकायदेशीरपणे कार्यालये थाटली आहेत. यामुळे चौकात नेहमीच वाहतूक कोंडी होते. तसेच, एका पक्षाचे कार्यालय काढून घेण्यासाठी त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. दोन दिवसानंतर हे कार्यालय न हटवल्यास त्याच्यावर देखील कारवाई करणार असल्याचे अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)