पिंपरी चौकात मराठा मोर्चाचा ठिय्या

पिंपरी – आरक्षणाच्या मुद्यावर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या हाकेला पिंपरी चिंचवडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला आहे. सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पिंपरी चौकात ठिय्या आंदोलन सुरु आहे.

शहरात सकाळपासून शुकशुकाट जाणवत आहे. सर्व बाजारपेठा बंद आहेत. अत्यावश्यक सुविधा वगळता कडकडीत बंद पाळला जात आहे. शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शहरातील मुख्य चौकात एरवी कायम मोठी गर्दी असते मात्र आज त्या ठिकाणी शुकशुकाट जाणवत आहे. चिंचवड आणि थेरगाव येथील घाटांवर अग्निशमन दल आणि महापालिकेचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहरातील महत्वाच्या रस्त्यांवर तुरळक वाहने धावताना दिसून येत आहेत. हिंजवडीतील बहुतांश कंपन्यांनी आज सुट्टी जाहीर केली आहे. तसेच काही कंपन्यांनी महत्वाच्या कर्मचाऱ्यांना सकाळी नऊच्या आत कामावर बोलावण्यात आले आहे. आंदोलनाची धग संपल्यानंतर रात्री उशिरा या कर्मचाऱ्यांना सोडण्यात येणार असल्याचे हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशनचे चरणजीत सिंग यांनी सांगितले. ते म्हणाले हिंजवडीत तीन लाखांवर कर्मचारी दररोज दाखल होतात. या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अनेक कंपन्यांनी सुट्टी दिली आहे. तर काही कंपन्यांनी घरातूनच काम मुभा अभियंत्यांना दिली आहे. त्यामुळे कायम गजबजलेल्या आयटीनगरीत शुकशुकाट आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)