पिंपरी-चिंचवड सी. ए. शाखेला उत्कृष्ट शाखा पुरस्कार

पिंपरी – दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंन्टस ऑफ इंडिया (आयसीएआय) वेस्टर्न रिजनतर्फे पिंपरी-चिंचवड शाखेला मध्यम गटात द्वितीय “बेस्ट ब्रॅंच ऑफ आयसीएआय’चा पुरस्कार मुंबई येथे प्रदान करण्यात आला. सलग पाचव्या वर्षी पिंपरी-चिंचवड शाखेने हा पुरस्कार पटकावला आहे.

आयसीएआयचे उपाध्यक्ष प्रफुल्ल छाजेड, पश्चिम विभागीय अध्यक्ष संदीप जैन यांच्या हस्ते पश्चिम विभागीय उपाध्यक्ष प्रियम शाह, सचिव पुरुषोत्तम खंडेलवाल, खजिनदार बाळकृष्ण अगरवाल, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष विक्रांत कुलकर्णी, प्रदीप अगरवाल, सर्वेश जोशी, श्रुती शाह यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष आमोद भाटे, उपाध्यक्ष आणि विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष युवराज तावरे, सचिव आणि खजिनदार प्राजक्ता चिंचोलकर, माजी अध्यक्ष सुहास गार्डी यांनी हा पुरस्कार स्विकारला. शाखेचे तत्कालीन अध्यक्ष रवींद्र नेर्लीकर यांनी गुंतवणूकदार जनजागृती कार्यक्रम, विद्यार्थ्यांसाठी विविध खेळ, औद्योगिक सहल, वृक्षारोपण, रक्तदान, नेत्र तपासणी शिबीर आदी समाजोपयोगी उपक्रम वर्षभर राबविल्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)