पिंपरी-चिंचवड शहर परिवर्तन लोगो, टॅगलाइन स्पर्धा; महापालिकेचा उपक्रम

पिंपरी – जीवनशैली उंचविण्यासाठी आणि शहराची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहर परिवर्तन प्रकल्प सुरू केला आहे. महानगरपालिकेने पहिल्यांदाच असा प्रकल्प हाती घेतला असून त्याअंतर्गत शहर परिवर्तनामध्ये नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी महापालिकेच्या वतीने लोगो आणि टॅगलाइन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहर परिवर्तन  यासाठी एक लोगो आणि टॅगलाइन देखील आवश्‍यक आहे. म्हणूनच, महानगरपालिकेच्या वतीने लोगो व टॅगलाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा असे अवाहन महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी केले आहे. ही स्पर्धा जिंकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांकाचे 25 हजार रुपयाचे बक्षीस देण्यात येणार आहे. तर द्वितीय क्रमांकसाठी 15 हजार व तृतिय क्रमांकासाठी 10 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच सर्वोत्तम टॅगलाईन साठी 10 हजार रुपयाचे बक्षीस महापालिकेच्या वतीने देण्यात येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या स्पर्धेतील विजेत्या लोगोचा वापर पिंपरी-चिंचवड शहर परिवर्तन  यासाठी अधिकृत लोगो म्हणून करण्यात येणार असून लोगो डिझाइनची अवलंबना आणि नाविण्यपुर्ण कल्पनांच्या आधारावर लोगोचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. महानगरपालिका नागरिकांच्या इच्छा व आकांक्षा जाणून घेऊन शहर परिवर्तन आराखडा राबवणार असून त्यासाठी नागरिकांचा सहभाग अपेक्षित आहे म्हणून महापालिकेच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)