पिंपरी-चिंचवड महापालिका आरोग्य विभागाला “झापले’

आमदार जगताप : …अन्यथा कारवाई करणार
पिंपरी। शहरात स्वाईन फ्लूने थैमान घातले आहे. आतापर्यंत तब्बल 20 लोकांचा मृत्यू झाला, तरीही महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने आवश्‍यक ती खरबदारी व उपाय-योजना न केल्याने भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्याची चांगलीच खरडपट्टी काढली. तसेच, संबंधीत विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम न केल्यास विभाग प्रमुखास जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही आमदार जगताप यांनी दिला.
ग-क्षेत्रीय समितीचे अध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन यांच्या मागणीनुसार विविध समस्या व प्रश्‍नांबाबत अधिकाऱ्यांची बैठक शुक्रवार दि. 14 ला थेरगाव येथील ग-क्षेत्रीय कार्यालयात झाली. क्षेत्रीय समिती तेथील समस्या व प्रश्‍नांचा निपटारा व्हावा म्हणून सत्ताधारी भाजपने बैठक आयोजित बैठकीस तब्बल 3 तास पालिकेचे सर्व अधिकारी उपस्थित होते. महापौर राहुल जाधव, आमदार जगताप, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्‍त श्रावण हर्डीकर, पालिकेचे सर्व विभाग प्रमुख, अधिकारी व क्षेत्रीय अधिकारी स्मिता झगडे, पोलीस ठाणे व वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक उपस्थित होते. शहरात स्वाईन फ्लूचा संसर्ग वाढला आहे. त्यावर पुणे शहराच्या तुलनेत पिंपरी-चिंचवड पालिकेने काय उपाय-योजना केली, असा प्रश्‍न आ. जगताप यांनी केला. वायसीएम रुग्णालयातील ओपीडीत दररोज सुमारे हजार रूग्ण का येतात? हा ताण कमी करण्यासाठी पालिकेने इतर दवाखान्यात सुविधा का दिल्या नाहीत? त्याकडे दुर्लक्ष का होते, असे प्रश्‍न उपस्थित करीत त्या संदर्भात तातडीने दक्षता घेण्याची सूचना त्यांनी केली. अधिकारी व कर्मचारी काम करीत नसल्यास संबंधित विभाग प्रमुखांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. ग-क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील स्थापत्य विषयक कामे तातडीने मार्गी लावण्याची सूचना जगताप यांनी अधिकाऱ्यांना केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)