“पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हल’ पुढील वर्षीपासून

पिंपरी – पुढील वर्षीपासून पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हल होईल, त्यात खंड पडणार नाही, असे महापौर राहुल जाधव यांनी जाहीर केले.

न्यायालयाच्या आदेशाचे कारण देऊन या वर्षी दिंडी प्रमुखांना देण्यात येणारी भेटवस्तू, पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हल, गणेशोत्सव सजावट स्पर्धा, गणेशोत्सवातील स्वागत कक्ष न उभारल्याबद्दल सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर टीका झाली होती. त्यामुळे महापौर जाधव यांनी बैठक घेतली.

या वेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, सह शहर अभियंता प्रवीण तुपे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, अपक्षांचे गटनेते कैलास बारणे, शहर सुधारणा समिती सीमा चौगुले, जैवविविधता समिती सभापती उषा मुंडे, नामदेव ढाके, सुलक्षणा धर, श्‍याम लांडे, तुषार कामठे, सहायक आयुक्त अण्णा बोदडे, मंगेश चितळे आदी उपस्थित होते.

सत्तारूढ पक्षनेते पवार म्हणाले, न्यायालयाच्या आदेशास अधिन राहूनच आपल्याला काम करायचे आहे. आपण कोणते उपक्रम राबवू शकतो किंवा नाही याबाबत पदाधिकाऱ्यांनी माहिती देणे गरजेचे आहे. न्यायालय आदेशाचा अवमान होणार नाही याची दक्षता घेऊ.

राहुल कलाटे म्हणाले, न्यायालय आदेश आल्यानंतर यासंदर्भात अधिकाऱ्यांनी तातडीची बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांना माहिती देणे गरजेचे होते. तसे झाले नाही. पालखी सोहळ्यातील भेटवस्तू, गणेश सजावट स्पर्धा, पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हलवरून टीका झाल्याने अधिकाऱ्यांना जाग आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)