पिंपरी-चिंचवड पॉलिटेक्‍निकला अधिस्विकृती प्रमाणपत्र

पिंपरी – पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या आकुर्डी येथील पिंपरी-चिंचवड पॉलिटेक्‍निक महाविद्यालयाचा (पीसीपी) राष्ट्रीय अधिस्विकृती प्रमाणपत्र संस्थेने (नॅशनल बोर्ड ऑफ ऍक्रेडिटेशन) नुकतेच राष्ट्रीय अधिस्विकृती प्रमाणपत्र देऊन गौरव केला.

यानिमित्त पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांच्या हस्ते पीसीपीच्या प्राचार्या व्ही. एस. बॅकोड यांचा व विभाग प्रमुखांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त भाईजान काझी, माजी मंत्री विश्वस्त हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पिंपरी-चिंचवड उद्योग क्षेत्रासाठी तांत्रिक कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी दिवंगत माजी खासदार शंकरराव बाजीराव पाटील यांनी 1990 साली पिंपरी-चिंचवड पॉलिटेक्‍निकची (पीसीपी) पायाभरणी केली. अल्पावधीतच पीसीपीचे नाव महाराष्ट्रात शैक्षणिक ब्रॅंड म्हणून नावारुपास आले. उत्कृष्ट तांत्रिक शिक्षणाबरोबरच पीसीपीला क्रीडा, तांत्रिक स्पर्धांमध्ये राज्य व राष्ट्रीय स्तरावर अनेक पारितोषिके मिळाली आहे. यामुळे उत्कृष्ठ शिक्षण गटातील नॅशनल एज्युकेशन समीट ऍवार्ड 2016 चा पुरस्कार मिळाला आहे. तसेच राष्ट्रीय स्तरावर तंत्रशिक्षणाचे नियंत्रण व नियमन करणा-या आयएसटीई संस्थेकडून महाराष्ट्र आणि गोवा विभागात आयएसटीई बेस्ट चॅप्टर ऍवार्ड मिळाले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)