पिंपरी-चिंचवडमध्ये साकारणार “स्मार्ट स्ट्रीट’

पिंपरी – पर्यावरण पूरक, नागरिकांच्या हितास प्राधान्य देणाऱ्या तसेच वायफाय, स्मार्ट ट्रान्सपोर्टेशन, रिसायकल्ड बेंचेस, सायकल मार्ग अशा आधुनिक सुविधा असलेले “स्मार्ट स्ट्रीट’ पिंपरी-चिंचवड शहरात साकारणार आहेत. त्यासाठी शहरातील स्वीडीश कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी “अर्बन डिझाईन’ स्पर्धेतून आर्किटेक्‍चरची निवड करण्यात आली आहे. त्यांना स्विडनमध्ये विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.

स्वीडनच्या राजदूतांनी यजमान पद भूषवित दापोडीतील सॅण्डविक एशिया कंपनीत नुकताच स्वीडनचा राष्ट्रीय दिन साजरा केला. यावेळी “स्मार्ट स्ट्रीट’ प्रकल्पाची माहिती देण्यात आली. तसेच “अर्बन डिझाईन’ स्पर्धेतील विजेते घोषित करण्यात आले. युवा वास्तु विशारदांना (आर्किटेक्‍चर) शाश्‍वत शहराचे नियोजन व स्थानिक मालकीचे सुनिश्‍चितीकरण यावर विचार करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी “अर्बन डिझाईन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पुण्यातील विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नोलॉजीच्या पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर या संस्थेचे पार्थ मतकरी व कौशल तातिया हे विजेते ठरले. शिक्षण, आरोग्य आणि विरंगुळा यांपासून प्रेरित “ग्रीन गंगा’ हा प्रकल्प त्यांनी सादर केला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या विजेत्यांनी तयार केलेली “मॉडेल्स’ “स्वीडिश ऍव्हेन्यू’च्या “डिझाईन’साठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे सादर करण्यात येणार आहे. “अर्बन डिझाईन’ स्पर्धेसाठी स्वीडनच्या कौन्सिल जनरल उलरिका सॅंडबर्ग, पिंपरी महापालिकेचे अभियंता श्रीकांत सावने, ऍटलास कॉप्को इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक जीओवान्नी वालेंट, सॅण्डविक आशियाचे व्यवस्थापकीय संचालक एरवीन स्टाइन हाउसर, अल्फा लावल इंडियाचे हेड ऑपरेशन मट्टीआस अँडरसन, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन (एनआयडी) चे संचालक प्रद्युम्न व्यास, ऍमेथिस्ट एंजल्सचे संचालक मंगेश भांडारकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

उलरिका सॅंडबर्ग म्हणाल्या, जगासमोर असलेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी शाश्वत शहरे आणि पायाभूत सुविधा या महत्त्वाच्या आहेत. “स्मार्ट स्ट्रीट्‌स’च्या माध्यमातून तंत्रज्ञान, उपाय, शहरी “डिझाईन’, ऊर्जा, वाहतूक, सर्क्‍युलर इकॉनॉमी, आयसीटी यावर भर दिला जाणार आहे. स्वीडिश कंपन्यांच्या आणि त्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांच्या मदतीने पुण्यातील रस्ते “स्मार्ट’, स्वच्छ व सुंदर होतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

काय आहे “स्मार्ट स्ट्रीट’?
सोलर पॉवर पोल्स, हवा प्रदूषणाची माहिती, पुनर्वापर प्रणाली आणि कचरा व्यवस्थापनाची व्यवस्था, रिसायकल्ड बेंचेस, सायकल मार्ग, वाहनांसाठी कनेक्‍टिव्हिटी, स्मार्ट ट्रान्सपोर्टेशन, संकेत चिन्हांचे बोर्डस, पादचाऱ्यांसाठी मार्ग, वाय-फाय आणि सीसीटीव्ही यांची सुविधा देऊ करणे आहे. ही स्ट्रीट पांढऱ्या, पिवळ्या आणि निळ्या रंगांनी रंगविली जाईल. झाडे आणि फुलांची रोपे लावली जातील आणि त्यांची निगा राखली जाईल. याहून अधिक म्हणजे, स्वीडीश आर्ट, डिझाईन्स आणि प्रदर्शने देखील शक्‍य तिथे दाखविले जातील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)