पिंपरी-चिंचवडचे स्वतंत्र पोलीस आयुक्तालय कार्यान्वित

पिंपरी – स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर पिंपरी-चिंचवडचे स्वतंत्र पोलीस आयुक्तालय कार्यान्वित करण्यात आले आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते ध्वजारोहण करून आयुक्तालयाचा कारभार सुरु करण्यात आला.

यावेळी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अतिरिक्त आयुक्त मकरंद रानडे, खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे, आमदार महेश लांडगे, अॅड. गौतम चाबुकस्वार, महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, महापौर राहुल जाधव, विरोधी पक्षनेते दत्ता साने, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, सभागृह नेते एकनाथ पवार, पोलिस उपायुक्त विनायक ढाकणे, स्मार्तना पाटील, नम्रता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

आयुक्तालयाचे कामकाज प्रेमलोक पार्क येथील इमारतीमधून चालणार आहे. मात्र इमारतीच्या नूतनीकरणाचे काम सुरु असल्याने ऑटो क्लस्टर येथे तात्पुरत्या स्वरूपात आयुक्तालय कार्यान्वित करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्याकडून ३२९ पोलिस अधिकारी आणि कर्मचारी वर्ग करण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी काढले. पुणे ग्रामीण पोलिसांकडून वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये ३४ सहाय्यक पोलीस फौजदार, ७९ पोलीस हवालदार आणि २१६ पोलीस नाईक, पोलीस शिपाई यांचा समावेश आहे. तसेच पुणे आयुक्तालयातून १ सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक, १८ सहायक पोलीस निरीक्षक, ७० उपनिरीक्षक वर्ग करण्यात आले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)