पिंपरी-चिंचवडकरांना सांस्कृतिक मेजवानी

पिंपरी – महापालिकेतर्फे गणेशोत्सवानिमित्त पिंपरी-चिंचवड फेस्टिवलचे आयोजन केले आहे. या फेस्टिवलमध्ये 1, 2 व 3 सप्टेंबरला होणा-या विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे. महाराष्ट्राच्या सुवर्णातारका भार्गवी चिरमुले, संस्कृती बालगुडे, दिपाली सय्यद, शिवानी भावकर हे खास आकर्षण असणार आहे.

चिंचवड येथे प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात शुक्रवारी (दि. 1) सायंकाळी सहा वाजता पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड महोत्सवाचे उद्‌घाटन होणार आहे. यावेळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती असून, त्यानंतर गणेश वंदना, ढोल-ताशाचा कार्यक्रम, लेझर शो आणि अशोक हांडे यांचा “आवाज की दुनिया’ हा कार्यक्रम होणार आहे. शनिवारी (दि.2) पिंपरी, संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात दुपारी 12 वाजल्यापासून कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. फिरोज मुजावर हे गणेश वंदना, कश्‍मिरी पंडीतांच्या समस्येवरील “मकबुल’ नाटक, मराठी व हिंदी गीतांचा “प्रथम तुला वंदितो’ हा कार्यक्रम, महिलांच्या समस्या मांडणारे “यंदा कदाचित’ हे विनोदी नाटक, त्यानंतर कपूर घराण्यातील सर्व कलाकारांवरील “द कपुर्स डायरी’ हा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी 7 वाजता चिंचवडच्या ऑटो क्‍लस्टर सभागृहात कवी संमेलन होणार आहे. यामध्ये स्थानिक कवींचा समावेश आहे.

रविवारी (दि.3) चिंचवडच्या मोरे सभागृहात दुपारी 12 वाजता नृत्य, गायन आणि वादन स्पर्धा, त्यानंतर भोसरीच्या अंकुशराव लांडगे नाट्यगृहात समृध्दी यादव गणेश वंदना सादर करतील, गीता शर्मा यांचे भरतनाट्य नृत्य, मराठी व हिंदी गीतांचे सादरीकरण, केरला फेस्टिवल व केरला फुडे फेस्टिवलही असणार आहे. महाराष्ट्राच्या सुवर्णतारका भार्गवी चिरमुले, संस्कृती बालगुडे, दिपाली सय्यद, शिवानी भावकर नृत्य सादर करणार आहेत. कॉमेडीची बुलेट ट्रेन फेम आशुतोष वाडेकर यांची लघुनाटिकेचे सादरीकरण होणार आहे. फेस्टिवल हा सर्व कार्यक्रम नागरिकांसाठी विनामुल्य आहे. शहरातील जास्तीत-जास्त नागरिकांनी या सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर नितीन काळजे यांनी केले. दरम्यान, पिंपरी-चिंचवड फेस्टिवल कार्यक्रमाच्या पत्रकार परिषदेस क्रीडा, कला सांस्कृतिक समितीचे सभापती लक्ष्मण सस्ते यांनी दांडी मारली. त्यामुळे पदाधिकाऱ्यांचे वाद चव्हाट्यावर येवू लागले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)