पिंपरी कॅम्पात मेट्रो उभारणार ट्रॅक्‍शन सब स्टेशन

पिंपरी – विजेवर धावणाऱ्या मेट्रोची विजेची गरज पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेडच्या वतीने पिंपरी कॅम्पात ट्रॅक्‍शन सबस्टेशन उभारण्यात येणार आहे. येथूनच पिंपरी ते स्वारगेट मार्गिकेच्या मेट्रोला वीज पुरवठा केला जाणार आहे.

मेट्रोचे मुख्य प्रकल्प अधिकारी गौतम बिऱ्हाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे मेट्रो अंतर्गत तीन ट्रॅक्‍शन सबस्टेशन उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी एक सबस्टेशन पिंपरी कॅम्प, उड्डाणपुलाजवळील मोकळ्या जागेत उभारण्यात येणार आहे. पुण्यातील गणेशखिंड रोड येथे एक स्टॅंडबाय ट्रॅक्‍शन सबस्टेशन उभे करण्यात येणार आहे. पिंपरी येथे एकूण 8600 चौरस मीटर भागात हे सबस्टेशन तयार करण्यात येत आहे. 2018 साली मेट्रोला येथून 25.7 एमव्हीए विजेची गरज आहे. 2021 ला ही आवश्‍यकता वाढून 27.6 एमव्हीए इतकी असणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अद्याप “डीपीआर’ सादर नाही
पहिल्या टप्प्यात मेट्रो पिंपरीपर्यंत धावणार होती, ती आता चिंचवडपर्यंत जाणार आहे. परंतु मेट्रो निगडीपर्यंत पहिल्य टप्यातच जावी, यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. मेट्रो निगडीपर्यंत नेण्यासाठी पालिकेने मेट्रोकडे “डीपीआर’ (विस्तृत प्रकल्प आराखडा)मागितला आहे. पालिकेच्या खर्चाने तयार होत असलेला हा “डीपीआर’ जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्‍तांना सादर होणे आवश्‍यक होते. परंतु अद्याप मेट्रोकडून हा “डीपीआर’ पालिकेला सादर करण्यात आला नाही. हा “डीपीआर’ सादर केल्यानंतरच पुढील हालचालींना वेग येणार आहे. मेट्रोने हे काम एका खासगी संस्थेला दिले आहे. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनुसार 25 ऑगस्टपर्यंत डीपीआर पालिका आयुक्‍तांना सादर करण्यात येण्याची शक्‍यता आहे.

आठ वर्षांपूर्वीचा “डीपीआर
भाजपशासित केंद्र आणि राज्य सरकार “मेट्रो’ला आपला महत्त्वाकांक्षी प्रकल्प सांगत असले तरी सध्या मेट्रोचे जे काम सुरू आहे त्याचा डीपीआर 2008-09 सालीच तयार करण्यात आला होता. त्यावेळी “डीपीआर’ दिल्ली मेट्रोने तयार केला होता, त्यावर तब्बल नऊ वर्षांनंतर काम सुरू झाले आहे. सध्या “डीपीआर’चे काम एका खासगी कंपनीला दिले आहे. एका दशकापूर्वी या शहराला वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी मेट्रोची गरज भासत होती. त्याची सुरुवात आता होत आहे. त्याचकाळात मेट्रो सुरू झाली असती तर मेट्रोचा खर्च खूप कमी झाला असता आणि वाहतूक समस्या ही इतकी तीव्र झाली नसती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)