पिंपरी कॅम्पात महापालिकेची कारवाई

पिंपरी – पिंपरी कॅम्पातील अतिक्रमणांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण नियंत्रण विभागाने कारवाई केली. दुकानासमोर वाढविलेले छत, फुटपाथ आणि बांधकामांवर कारवाई करण्यात आली. कारवाईला सुरुवातील व्यापाऱ्यांनी विरोध केला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

महापालिकेच्या “ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील पिंपरी कॅम्पात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. कॅम्पातील साई चौक ते गेलॉर्ड चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील दुकानाच्या बाहेर फुटपाथवर तयार केलेल्या पायऱ्या, ओटे तयार केले आहेत. त्यामुळे वाहतुकीला व नागरिकांना येण्या-जाण्यासाठी अडथळे निर्माण होत आहेत. महापालिकेने वारंवार सूचना करुनही अतिक्रमण काढून घेण्यास टाळाटाळ करण्यात आली. नोटीस पाठवूनही त्याकडे दुर्लक्ष झाले. उलट दिवसें-दिवस अतिक्रमणांमध्ये वाढ होत आहे. अतिक्रमणामुळे बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांना चालण्यासाठी फुटपाथ उरलेला नाही. रस्त्यांवरही वाहने उभी केली जात असल्याने सणासुदीच्या वेळी तासन्‌तास वाहतूक कोंडी होते.

-Ads-

अखेर महापालिकेने आज जेसीबीच्या सहाय्याने हे अतिक्रमण काढण्यात आले. दुकानाच्या शटरला लावलेल्या जाळ्या गॅस कटरने कापून जप्त करण्यात आल्या. त्याचबरोबर दोन विनापरवाना हातगड्या जप्त करण्यात आल्या. जप्त केलेल्या हातगाड्या नेहरुनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आल्या आहेत. सुरुवातीला काही व्यापाऱ्यांनी करवाईला विरोध केला. मात्र, पोलीस फौजफाट्यापुढे त्यांना माघार घ्यावी लागली. यापुढेही कारवाई सुरूच ठेवण्याचा इशारा महापालिकेच्या “ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने देण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)