पिंपरीमध्ये अजितदादा चषक हॉकी स्पर्धा

पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरीमध्ये अजितदादा चषक राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शहर युवक अध्यक्ष विशाल वाकडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्र हॉकी संघटनेच्या मान्यतेने पिंपरीतील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडीयम येथे 16 जुलै ते 22 जुलै पर्यंत राज्यातील एकूण 20 नामांकित हॉकी संघांमध्ये बाद पध्दतीने या स्पर्धा होणार आहेत.

यामध्ये बॉम्बे इंजिनिअरींग ग्रुप, मध्य रेल्वे, क्रीडा प्रबोधिनी, रेल्वे पोलीस, एसआरपीएफ, अस्पात ऍकॅडमी, पीसीएमसी इलेव्हन, हॉकी युनायटेड, हॉकी लव्हर्स, किडस्‌ इलेव्हन, चिखलवाडी यंग बॉईज, आयकर विभाग पुणे, पुणे शहर पोलीस, रक्षक स्पोर्टस्‌ क्‍लब, प्रियदर्शनी खडकी, जीएस्‌टी ऍण्ड कस्टम्स्‌ संघ, सातारा इलेव्हन आदी संघ सहभागी होणार आहेत.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते विजेत्या संघाला 22 जुलै रोजी पंचवीस हजारांचे पारितोषिक, अजितदादा चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच सर्वोत्कृष्ट खेळाडू, गोलरक्षक, बचावपटू, मधल्या फळीतील खेळाडू, आघाडीपटू, सामन्याचा मानकरी यांनाही पारितोषिक, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)