पिंपरीत रोजगार मेळाव्यात 473 विद्यार्थ्यांचा सहभाग

पिंपरी, (प्रतिनिधी) नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने आणि इक्वीटास स्मॉल फायनान्स यांच्या सहकार्याने नुकतेच पिंपरीगावात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात 265 गरजूंना पुढील मुलाखतीसाठी पत्र देण्यात आले तर एकूण 473 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

या रोजगार मेळाव्यामध्ये बॅंकींग, फार्मास्युटिकल्स, हॉटेल मॅनेजमेंट, हाऊस किपींग, इंडस्ट्रीअल प्रोडक्‍शन, इंडस्ट्रिअल सेल्स ऍण्ड सर्व्हिस, मार्केटिंग नालिसीस, इन्शुरन्स आणि कन्सलटिंग क्षेत्रातील मान्यवर कंपन्यांसह युरेका फोर्ब्ज, टाटा ए. आए. ए. लाईफ, ए. के. एन्टरप्रायझेस, आय. सी. आय. सी. आय. बॅंक, बी. व्ही. जी इंडिया ग्रुप, इनोव्ह सोर्स, अयुर इंडिया प्रा. लिमिटेड, वेदांत कन्सल्टन्सी, जी. एम. सी. एफ. एस. पिंपरी या प्रमुख कंपन्या सहभागी झाल्या होत्या.

या मेळाव्याच्या संयोजनात अमित कुदळे, मयुर कचरे, निखील दुर्गे, संदीप कांबळे, दत्तात्रय टेकाळे, हरीष वाघेरे आदींनी सहभाग घेतला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)