पिंपरी – भारतात सर्वात महाग पेट्रोल हे महाराष्ट्रात मिळतं, पेट्रोल, डिझेलच्या दरात झालेली भरमसाठ वाढ. महागाईने कळस गाठलेला असताना पेट्रोल, डिझेलच्या दरात झालेली वाढ हा सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर राजरोसपणे टाकलेला दरोडा असल्याचे सांगत पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात आज (शनिवार) पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दुचाकीची टाळ मृदंगच्या गजरात प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या अंतयात्रेची सांगता मोरया गोसावी मंदिराजवळील घाटावर करण्यात आली. या अंतयात्रेत वारकरी पथक, सर्वसामान्य नागरीक, कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी सरकार विरोधी घोषणा देण्यात आल्या. यावेळी महिला कार्यकर्त्यांची उपस्थितीही मोठ्या प्रमाणावर होती.
‘राम नाम सत्य है, अच्छे दिन मस्त है’ अशा घोषणा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या. उच्चांकी दरवाढीचा आलेख फलकाचा माध्यमातून नागरिकांच्या समोर मांडण्यात आला होता. या प्रतिकात्मक अंत्ययात्रेला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, आलोक गायकवाड आदी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा