पिंपरीत भेंडी, वांगी, कोथिंबीरीची आवक वाढली

पिंपरी-पिंपरीत भाजीपाल्याची आवक वाढली आहे. मात्र,सलग तिसऱ्या आठवड्यात कांद्याची घसरण सुरूच आहे. कांद्याची आवक 35 क्विंटल झाली असून, 14 क्विंटलने आवक घटली असून, भावातही 400 रुपयांची घट झाली आहे. भेंडीची आवक सहा क्विंटलने वाढून भावात 750 रुपयांची घट झाली. गवारीची आवक दोन क्विंटलने घटूनही भावात 1000 रुपयांची वाढ झाली. टोमॅटोची आवक नऊ क्विंटलने घटूनही भावात किरकोळ 50 रुपयांची घट झाली. घेवड्याची सहा क्विंटल आवकघटून, भाव 500 रुपयांनी वधारला. फ्लॉवरची आवक स्थिर राहन, भावात 150 रुपयांची वाढ झाली.
दुधी भोपळ्याची आवक तीन क्विंटलने घटून, भावात 350 रुपयांची घट झाली. काकडीची तीन क्विंटल आवक वाढून, भाव 550 रुपयांनी घटला. कोबीची तीन क्विंटल आवक घटून, भाव 200 रुपयांनी वधारले. वांग्याची आवक दोन क्विंटलने वाढून, भावात सर्वाधिक 2000 रुपयांची घट झाली.कारल्याची एक कविंटल आवक होऊन, भाव 1600 रुपयांवर स्थिरावला. घोसावळ्याची आवक एक क्विंटलने घटून, भाव 250 रुपयांनी वधारला.

पालेभाज्यांमध्येकोथिंबीरीच्या दोन हजार 400 गडड्या, शेपूच्या 2000 गड्‌डया, पालकच्या दोन हजार 350 गडड्या, करडईच्या 500 गड्‌डया आवक झाली. तसेच अंबाडीच्या 750 गड्‌डया तर चवळीच्या 750 गड्ड्या आवक झाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)