पिंपरीत भेंडी, गवार, कोबीची आवक

पिंपरी – उपबाजारात फळभाज्यांची 127 क्विंटलने तर पालेभाज्यांची 11 हजार 400 गड्ड्यांनी आवक वाढली. कांद्याची आवक 11 क्विंटलने घटून, भावात 50 रुपयांची किरकोळ वाढ झाली. भेंडी आठ क्विंटलने वाढून, 500 रुपयांची भाव वाढ झाली. टोमॅटोची 11 क्विंटल आवक घटून, भाव 200 रुपयांनी वधारला.

कोबीची दोन क्विंटल आवक वाढुन भाव 50 रुपयांची घट झाली. वांग्याची आवक तीन क्विंटलने घटून भाव 300 रुपयांनी वधारला. दोडक्‍याची दोन क्विंटल आवक घटून, भाव 100 रुपयांची घट झाली. फ्लॉवरची आवक दोन क्विंटलने घटून, भाव 250 रुपयांनी वधारले; तर काकडीची एक क्विंटल आवक वाढून, भाव मात्र 150 रुपयांनी घटले. घेवड्याची तीन क्विंटल आवक वाढून,भाव 200 रुपयांनी वधारले. कारल्याची आठ क्विंटल आवक घटूनही भाव मात्र स्थिर राहिले.

वालवरची आवक पाच क्विंटलने घटून, भावात 250 रुपयांची वाढ झाली. शेवग्याची आवक चार क्विंटलने घटून, भावात 150 रुपयांची घट झाली; ढोबळी मिरचीची आवक 10 क्विंटलने वाढून, भाव 250 रुपयांनी घटले. बीटची आवक स्थिर राहून, भावात 200 रुपयांची वाढ झाली. घोसावळ्यांची आवक दोन क्विंटलने घटून, भाव 250 रुपयांनी घटले. मका कणीसची पाच क्विंटल आवक होऊन, भाव 800 रुपयांवर स्थिरावला. कैरीची 10 क्विंटल आवक झाली असून, भाव 4500 रुपयांवर स्थिरावला. पालेभाज्यांमध्ये कोथिंबीरीच्या 11 हजार गड्ड्यांची आवक झाली. तर मेथीची चार हजार 382 गड्ड्या आवक झाली आहे. याशिवाय शेपूची 1400 गड्ड्या, मुळे 765 गड्ड्या, पुदीना 1325 गड्ड्या, पालक 2675 गड्ड्या, चवळीच्या 50 गडड्या, मुळ्याच्या 765 गडड्या; तर कांदापातच्या 2310 गडड्‌यांची आवक झाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)