पिंपरीत बारा तासांत आगीच्या दोन घटना

एकाचा होरपळून मृत्यू तर वृद्ध 60 टक्‍के भाजला

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात बारा तासांत आगीच्या दोन दुर्घटना घडल्या. एका घटनेत एक अज्ञाताचा होरपळून मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेत सिगारेट पेटविताना तोल गेल्याने शेकोटीत पडून एक वृद्ध 60 टक्के भाजला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अशोक काशिनाथ जाधव (वय-66, रा. पिंपरी) असे सिगारेट पेटविताना भाजलेल्या वृद्धाचे नाव आहे. पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव हे शनिवारी रात्री दारू पिऊन घरी चालले होते. त्यातच त्यांना सिगारेट पिण्याची तलफ आली. यामुळे तोंडात सिगारेट पकडून त्यांनी शेकोटीवर पेटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, दारू प्यायल्यामुळे त्यांचा तोल जाऊन ते शेकोटीत पडले. या घटनेत ते 60 टक्के भाजले. त्यांच्यावर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

तर दुसऱ्या घटनेत डीपीला लागलेल्या आगीत एका व्यक्तीचा गंभीररित्या जळून मृत्यू झाला. ही घटना आज (रविवारी) दुपारी पावणे एकच्या सुमारास डांगे चौकाजवळ घडली. डांगे चौकाजवळ बीआरटी रोडमध्ये असलेल्या एका इलेक्‍ट्रिक डीपीला आग लागली. याबाबतची माहिती पुणे अग्निशमन विभागास मिळाली. पुणे अग्निशमन विभागाने ही माहिती तात्काळ रहाटणी अग्निशमन विभागाला कळवली. दरम्यान काही स्थानिक नागरिकांनी देखील रहाटणी अग्निशमन विभागाला माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार रहाटणी अग्निशमन विभागाचे लिडिंग फायरमन संतोष सरोटे, फायरमन विजय घुगे, भूषण येवले, विशाल पोटे आणि वाहन चालक राजाराम लांडगे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

वीज पुरवठा खंडित करण्यात आला. विद्युत विभागाचे अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले. वीजपुरवठा खंडित झाल्याची खात्री झाल्यानंतर आग विझवण्यात आली. दरम्यान, डीपीमध्ये एक व्यक्ती गंभीररीत्या भाजली आहे. त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटली नसून आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. वाकड पोलीस तपास करीत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)