पिंपरीत फ्लॉवर, टोमॅटोची आवक वाढली

पिंपरी -दिवाळीनंतर पिंपरीत भाजीपाल्याची आवक वाढली आहे. टोमॅटो, फ्लॉरवची आवक वाढली असून, वांगी आणि दोडक्‍याची आवक मात्र स्थिर आहे. कांद्याची आवक स्थिर राहून, क्विंटलमागे भावात सरासरी 300 रुपयांची वाढ झाली. भेंडीची आवक एक क्विंटलने घटून, भावात 100 रुपयांची घट झाली. गवाराची आवक एक क्विंटलने वाढून, भावात 3000 रुपयांची घट झाली आहे. टोमॅटोची 16 क्विंटलने आवक वाढून भावात मात्र, 100 रुपयांची घट झाली. याशिवाय कारल्याची एक क्विंटल आवक घटून, भाव 200 रुपयांनी घसरले. फ्लॉवरची 16 क्विंटल आवक वाढून, भाव 100 रुपयांनी गडगडला. याशिवाय घेवड्याची तीन क्विंटल आवक वाढूनही भावात 100 रुपयांची घट झाली. कोबीची एक क्विंटल आवक वूान, भाव 300 रुपयांनी वधारला. या आठवड्यात वांग्याची आवक व भाव स्थिर राहिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)