पिंपरीत दोन घटनेत 38 वाहनांची तोडफोड

पिंपरी – पिंपरीत वाहनफोडीच्या दोन घटना घडल्या. या दोन्ही घटनांमध्ये एकूण 38 वाहनांचे नुकसान झाले आहे. या तोडफोडप्रकरणी एकूण 30 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय दोन अल्पवयीन बालकांचा खराळवाडीतील गुन्ह्यात समावेश आहे. योगेश नामदेव वेताळ (रा. भारतमातानगर, खराळवाडी, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.14) रात्री दहाच्या सुमारास खराळवाडीत एका अल्पवयीन मुलाला धक्का लागला होता. त्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली होती. धक्का लागलेल्या मुलाने 20 -25 जणांच्या टोळक्‍याला बोलावून घेतले आणि दिसेल त्या वाहनाची तोडफोड करण्यास सुरुवात केली. या तोडफोडीतसुमारे 33 वाहनांची काचा फोडण्यात आल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून 30 अल्पवयीन मुले फरार आहेत.फिर्यादीच्या वाहनाच्या चारचाकीची तोडफोड करून, त्यांच्या खिशातील दोन हजार रुपये रुपये जबरदस्तीने काढून घेतले. या घटनेमुळे खराळवाडीत दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

दुसऱ्या घटनेत साऊंडच्या रॅकवर चढून नाचू न दिल्याचा राग आल्याने चार जणांच्या टोळक्‍याने पाच दुचाकींची तोडफोड केली. ही घटना पिंपरी बौद्धनगर येथे शनिवारी (दि.14) रात्री साडे दहा वाजता घडली. तसेच अरू अर्जुन वाघमोडे याला मारहाण करुन त्याच्या खिशातील 2200 रुपये जबरदस्तीने काढून घेतले.

तिसऱ्या घटनेत बौद्धनगरमध्येच पुुर्ववैमनस्यातून एका तरुणाला चार जणांच्या टोळक्‍याने मिरवणुकीत बेदम मारहाण केल्याची घटना घडली. बौद्धनगरमधील एका मंडळाने काढलेल्या मिरवणुकीत ही गटना घडली. सुमित सूर्यवंशी (वय19) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. एकाच दिवशी काही फरकाच्या अंतराने एकाच परिसरात वाहनांची तोडफोड आणि हाणामारीच्या घटना घडल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. पिंपरी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)