पिंपरीत तिघांनी तरुणाला लुटले

पिंपरी – नेहरुनगर येथे तिघांनी पादचाऱ्याला कोयत्याचा धाक दाखवून लुटले. ही घटना पिंपरीतील अण्णासाहेब मगर स्टेडियमजवळ शुक्रवारी रात्री घडली.

कमलेश चव्हाण (वय-21, रा. संत तुकारामनगर, पिंपरी) या तरुणाने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरील अनोळखी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमलेश संत तुकारामनगर येथील आपल्या घरी येत असताना अण्णासाहेब मगर स्टेडियमजवळ अचानक दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्याला अडविले. त्याला जबरदस्तीने दुचाकीवर बसविले. कोयत्याच्या धाकाने त्याच्याकडील रोकड व मोबाईल असा एकूण साडेसहा हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. पिंपरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विठ्ठल बढे तपास करीत आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)