पिंपरीत झाड तोडणाऱ्यांवर आता मालमत्ता चोरीचा गुन्हा

छाटणीच्या नावाखाली धंदा : महापालिका आयुक्‍तांची आक्रमक भूमिका

पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहरात बेकायदा मोठ्या प्रमाणात सर्रासपणे वृक्षतोड सुरू आहे. फांदा छाटणीच्या नावाखाली संपूर्ण वृक्षच कापून नेण्याचा धंदा शहरात तेजीत आहे. हे प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाचे दुर्लक्ष आणि पालिका नियम कठोर नसल्याने त्यास आळा बसत नाही. त्यामुळे नियमात बदल करून वृक्ष तोडीप्रकरणी मालमत्ता चोरीचा फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा सूचना वृक्ष प्राधिकरण समितीचा सदस्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केल्या आहेत. त्यानुसार त्यांनी कार्यवाही करण्याची ग्वाही दिली आहे. सदर नियम अंमलात आल्यानंतर वृक्षतोड करणाऱ्यांना तुरूंगाची हवा खावा लागणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहरात सर्रासपणे मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल सुरू आहे. विशेषत: प्राधिकरण, प्रेमलोक पार्क, चिंचवड, वाकड, संजीवनी सोसायटी इंद्रायणीनगर या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोडीचे प्रकार घडल्या आहेत. या संदर्भात पर्यावरणप्रेमींनी पालिका व पोलिसांकडे पुराव्यांसह तक्रारी केल्या आहेत. तसेच, वृक्षतोडीचे छायाचित्र व चित्रीकरण सादर केले आहे. मात्र, पालिकेच्या उद्यान विभागाने त्यांची गांभीर्याने दखल घेतलेली नाही. केवळ 5 ते 10 हजार रूपये दंड मारून वाहनांसह लाकडे सोडून दिले जातात. तसेच, उद्यान विभागाच्या निरीक्षकांनी पंचनामा करण्यास विलंब केल्याने अनेक वाहनचालक पसार झाले आहेत. वृक्षतोडीच्या या गैरव्यवहारात पालिकेच्या उद्यान विभागाचे अधिकारीही सामील असल्याचा आरोप समितीच्या सदस्यांनी केला आहे.

वृक्षतोडीबाबत पालिकेचे नियम कठोर नसल्याने दोषींवर कठोर कारवाई केली जात नसल्याने हे वृक्ष कत्तलीचे नित्याचे झाले आहेत. त्यामुळे सदर नियम कठोर करण्याची मागणी सदस्यांनी केली आहे. पालिकेच्या मालकीचे झाड तोडल्याने संबंधितांवर मालमत्ता चोरीचा फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी सदस्यांनी केली. त्यानुसार पालिका नियमात बदल करण्याचा सल्ला पालिकेचे आयुक्त व समितीचे अध्यक्ष श्रावण हर्डीकर यांना दिला आहे. तसेच, तडजोड म्हणून 7 हजार रूपये दंड न वसुल करता वाहनांसह सर्व लाकडे जप्त करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा सूचना समितीने दिला आहे. सदर नियम कडक करण्याची ग्वाही आयुक्तांनी दिली आहे. सदर नियमाची अंमलबजावणी झाल्यानंतर दोषींना तुरूंगांची हवा खाली लागणार आहे. तसेच, वृक्ष तोडीसाठी ज्याप्रमाणे परवानगीसाठी अर्ज केला जातो. त्यामुळे फांदा छाटणीसाठीही परवानगी अर्ज सादर करण्याची सक्ती करावी, अशी सूचना महापालिका वृक्ष संवर्धन समितीने केली आहे.

महापालिका कर्मचारी सक्षम नाहीत…
शहरातील धोकादायक वृक्ष तोडण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका परवानगी देते. परवानगी दिलेली झाडे व फांदा तोडली जातात. त्यासाठी पालिका संबंधित ठेकेदारास मोबदला देत नाही. तोडलेल्या झाड्यांचे खोड व फांदाचे लाकूड विकून ठेकेदार त्यांचा खर्च वसुल करतो. हा खर्च निघून नफा व्हावा, म्हणून ठेकेदार अधिक प्रमाणात झाडे तोडतात. ट्रकच्या ट्रक भरून सर्रासपणे झाडे तोडतात, अशी तक्रार सदस्यांनी केली आहे. तसेच, झाडे तोडण्यासाठी पालिकेचे कर्मचारी सक्षम नसल्याचे ठेका दिला जात असल्याचे वृक्ष संवर्धन समितीच्या सदस्यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)