पिंपरीत चिमुकलीवर अत्याचार

पिंपरी – कोवळ्या कळ्यांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यात भर घालणारा धक्कादायक प्रकार पिंपरीमध्ये घडला आहे. एका आठ वर्षाच्या चिमुकलीवर 30 वर्षीय युवकाने भर दिवसा बलात्कार केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार सोमवारी (दि. 14) दुपारी एकच्या सुमारास पिंपरी येथे घडला.

या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गोविंद भगवान अडसूळ (वय 30, रा. मिलिंदनगर, पिंपरी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अडसूळ याने सोमवारी 8 वर्षीय पीडित मुलीला धमकी देऊन बोलावले. तिच्यावर बलात्कार केला. ही बाब मुलीच्या घरच्यांना समजली तेंव्हा घरच्यांनी तात्काळ पिंपरी पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक रत्ना सावंत तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)