पिंपरीत अल्पवयीन मुलीवर मंदिरात अत्याचार

पिंपरी – खराळवाडी मधील एका मंदिरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी (दि. 9) भरदिवसा घडली असून अत्याचार करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणी आठ वर्षीय पीडित मुलीच्या आईने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रोहन भांडेकर (वय-18, रा. पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

-Ads-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास खराळवाडी येथील एका मंदिरात खेळण्यासाठी गेली होती. मुलगी खेळत असताना आरोपीने तिला मंदिरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलीने हा प्रकार घरी जाऊन आईला सांगितला. त्यावरून आईने पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दरम्यान, आरोपी फरार झाला होता. पिंपरी पोलिसांनी त्याचा शोध घेऊन अटक केली. त्याला मोरवाडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला सोमवार (दि. 18) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)