पिंपरीत अल्पवयीन अत्याचार प्रकरणी कँडल मार्च

मोर्चकऱ्यांकडून सरकारचा जाहीर निषेध 

पिंपरी: हिंजवडी येथील कासारसाई, पिंपरी व देशातील अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या बलात्कार व अत्याचार विरोधात अन्याय व अत्याचार प्रतिबंधक समिती च्या वतीने  पिंपरी येथील आंबेडकर चौक येथे कँडल मार्च काढून आरोपींचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून लवकरात लवकर  त्यांना फाशी द्यावी अशी मागणी करण्यात आली. या मोर्चात मोठ्या संख्येने महिला, पुरुष, लहान मुली यांनी सहभाग घेतला होता

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काय आहे प्रकरण?? 

पुण्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. गणेश निकम आणि त्याच्या अल्पवयीन मित्राने दोन लहान मुलींना चॉकलेटचे आमिष दाखवून हिंजवडीजवळ असलेल्या कासारसाई येथे बलात्कार केला. यामध्ये एका मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या दोन्ही मुली ऊसतोड कामगारांच्या मुली होत्या.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी ‘येथे‘ क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)