पिंपरीत अत्याचारप्रकरणी अल्पवयीनांवर गुन्हा

पिंपरी – पाच व सहा वर्षांच्या दोन बहिणींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांविरुद्ध पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पिंपरीगावात हा प्रकार समोर आला असून पाच व सहा वर्षांच्या दोन बहिणींसोबत हा प्रकार घडला.

लैंगिकतेबद्दल ना-समज असलेल्या या मुलींसोबत 14 आणि 16 वर्षांच्या दोन मुलांनी लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार मागील चार महिन्यांपासून सुरू होता. दरम्यान, एका सामाजिक संस्थेद्वारे मुलींच्या शाळेत गुड टच आणि बॅड टच या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर या चिमुरड्या बहिणींना आपल्यासोबत होत असलेले कृत्य बॅड टच असल्याचे उमगले.

बॅड टच कळल्यामुळे त्यांनी आपल्यासोबत घडत असलेला प्रकार शिक्षकांजवळ बोलून दाखवला. शिक्षकांना हा प्रकार लैंगिक अत्याचाराचा असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने तो मुलींच्या घरी सांगितला. त्यानुसार या मुलींच्या आईने पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर दोन अल्पवयीन मुलांविरुध्द गुन्हा दाखल केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)