पिंपरीत अतिक्रमण कारवाईदरम्यान धुमश्‍चक्री

पिंपरी – पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ फलाटाची लांबी वाढवण्याचे काम सुरु असून या कामासाठी रुळाच्या आसपास असणाऱ्या अनधिकृत झोपड्यांवर शनिवारी (दि. 17) कारवाई सुरू येथील रहिवाशांनी कारवाईला जोरदार विरोध केला. अतिक्रमण पथकाला तेथून हुसकावून लावण्यासाठी हातात येईल ते साहित्य आणि तुफान दगडफेक केली. जमावातील एकाने लाकडी ओंडक्‍याला आग लावली. वातावरण चिघळल्याने जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. अखेर ही कारवाई अर्ध्यावर थांबविण्यात आली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पिंपरी रेल्वे स्थानकावर मालवाहू गाड्या व एक्‍सप्रेस गाड्यांच्या डब्ब्यांना फलाट पुरत नसल्याने रेल्वे प्रशासनाने फलाटाची लांबी वाढवण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूला अनधिकृत झोपड्या असल्याने त्यांना हटवण्याचे काम सध्या रेल्वे प्रशासन करत आहे. मात्र नागरिकांचा त्याला विरोध होत असल्यामुळे गेल्या महिनाभरापासून पोलीस फौजफाट्यात अतिक्रमण हटवण्याचे काम सुरु आहे. शनिवारी देखील कारवाई सुरु असताना नागरिकांनी पोलिसांनी विरोध करत त्यांच्यावर दगडफेक केली. दुपारी दोन तास हे ताणावाचे वातावरण होते.

निराधारनगर येथे रेल्वे रूळागलगत सुमारे दोनशेहून अधिक झोपड्या आहेत. रेल्वे प्रशासनाने झोपडीधारकांना दीड महिन्यापूर्वीची नोटीस देण्यात आली होती. मात्र घरे रिकामी न केल्यामुळे रेल्वे प्रशासनाने अतिक्रमण कारवाईस सुरुवात केली होती.

रेल्वे रूळाच्या दोन्ही बाजुस रेल्वे पोलीस फौजफाटा घेऊन दोन जेसीबीच्या साह्याने अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू होण्यापूर्वीच रहिवाशांचा जमाव जमला होती. नागरिकांनी स्वत:हून अतिक्रमण हटवावीत, त्यांचे संसारपयोगी साहित्य बाजुला घ्यावे. अशा सूचना देण्यात येत होत्या. बहुतांशी लोकांनी त्यास दाद दिली नाही. काही रहिवाशांनी त्यांच्या घरातील चीजवस्तु रेल्वे रूळाच्या पलिकडील बाजूस नेल्या. टेम्पो, रिक्षातून साहित्य अन्यत्र नेले. या ठिकाणी राहणाऱ्या काही रहिवाशांनी मात्र जेसीबीच्या साह्याने झोपड्या पाडण्याची कारवाई सुरू होताच, रेल्वे रूळावरील दगड उचलून पोलीस आणि जेसीबीच्या दिशेने दगडफेक केली. हातात येईल त्या वस्तू पोलिसांच्या दिशेने भिरकाविल्या जात होत्या. दिवाळीच्या आधी रेल्वे प्रशासनाने संबंधित अनधिकृत झोपडपट्ट्यांना नोटीस बजावल्या होत्या. मात्र, त्यास कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने शनिवारी रेल्वे पोलीस व महाराष्ट्र पोलिसांनी संयुक्त कारवाई करून बुल्डोझरच्या साह्याने 78 झोपडपट्टी व 17 दुकाने हटवली आहेत.

झोपडीधारकांनी मात्र महापालिका प्रशासनावर राग व्यक्त केला असून आम्ही गेल्या 25 वर्षांपासूनचे रहिवासी आहेत. आमच्याकडे मतदान ओळखपत्र व अन्य रहिवासी पुरावे आहेत. अनेक वर्षांपासून राहणाऱ्या रहिवाशांना बेघर करू नये. त्यांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी वेळोवेळी झोपडीधारकांच्या वतीने महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली होती. तरीही प्रशासनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

काय आहे प्रकरण?
पिंपरी रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मची पुणे ते लोणावळा जाणाऱ्या दिशेला 153 मीटर लांबी वाढवण्यात येणार तर लोणावळा ते पुणे या रुळाची लोणावळा दिशेला 35 मीटर लांबी वाढणार आहे. तसेच लोणावळा ते पुणे याच प्लॅटफॉर्मची पुणे दिशेला 121 मीटर लांबी वाढवण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाने पिंपरी रेल्वे स्थानकावर काम सुरु केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)