पिंपरीतील रिक्षावाल्याचा प्रमाणिकपणा

प्रवासी महिलेचे साडे तीन लाखांचे दागिने परत केले!
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील देहू रोडमध्ये रिक्षावाल्याच्या प्रामाणिकतेचे दर्शन सर्वांना झाले. रिक्षाचालक वसीम शेख यांनी प्रवासी महिलेचे साडे तीन लाखांचे दागिने परत केल्याची घटना गुरूवारी रात्री घडली आहे.
गुरुवारी रात्री आठच्या सुमारास वसीम शेख हे देहू रोडजवळील शेलारवाडी येथील भेगडे कुटुंबीयांना एका रुग्णालयातून घेऊन निघाले होते. भेगडे यांना घरी जाण्यापूर्वी आणखी एक काम पूर्ण करायचे असल्याने त्या मध्येच उतरल्या. मात्र, त्यांच्या 4 बॅगांपैकी सोन्याचे दागिने असणारी बॅग ते रिक्षात विसरल्या. अगदी पाच मिनिटांनी त्यांच्या लक्षात येताच त्यांनी वसीमची शोधमोहीम सुरु केली. स्थानिकांच्या मदतीने भेगडे यांनी प्रत्येक रिक्षावाल्याकडे विचारपूस सुरु केली. सुदैवाने वसीम एका ठिकाणी सापडला असता त्याने भलत्याची बॅग समजून त्रयस्थ व्यक्तीला दिली होती. मात्र, प्रामाणिक वसीमला त्या व्यक्तीचा पत्ता माहित असल्याने त्याने तातडीने त्रयस्थ व्यक्तीचे घर गाठले. बॅग घेतली आणि त्या महिलेला सुपूर्द केली. बॅग पाहताच क्षणी महिलेला अश्रू अनावर झाले. महिलेसह स्थानिकांनी वसीमच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)