पिंपरीतील तोडफोडप्रकरणी एकास अटक

पिंपरी – नेहरूनगर, विठ्ठल नगर परिसरात 10-12 जणांच्या टोळक्‍याने हातात शस्त्र घेऊन धुडगूस घातला. रस्त्याच्या बाजूला उभी केलेली वाहने फोडत दोन जणांवर वार देखील केले. याप्रकरणी एकाला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (दि.15) रात्री पावणे अकराच्या सुमारास घडली होती.

गणेश रामदास नेहरकर (वय-39, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दिनेश भारत गायकवाड (वय-25, रा. विठ्ठलनगर, पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तसेच रिंकु उर्फ करण पिटेकर (वय 20 रा. बालाजीनगर, पिंपरी), नारायण शिंदे (रा. बालाजीनगर, पिंपरी) यांच्यासह सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास 10-12 जणांच्या टोळक्‍याने विठ्ठल नगर परिसरातील वाहनांची तोडफोड केली. दरम्यान नेहरकर कामावरून घरी जात होते. टोळक्‍याने नेहरकर यांना अडवून बेदम मारहाण केली. त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. तसेच संभाजी भगवान म्हस्के (वय-36, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांना देखील मारहाण केली. दुचाकी, रिक्षा आणि कार अशा एकूण 10-12 वाहनांच्या काचा फोडल्या. यामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विठ्ठलनगर परिसरासह संतोषी माता चौक, क्रांती चौक या भागातही टोळक्‍याने धुडगूस घातला. धुडगूस घालणाऱ्या टोळीतील एकाला अटक करण्यात आली असून त्याचे अन्य साथीदार फरार आहेत. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)