पिंपरखेड शाळेत विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

टाकळी हाजी- पिंपरखेड (ता.शिरूर) येथील जिल्हा परिषद शाळेत सामाजिक कार्यकर्ते किरण ढोमे यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेतील सर्व मुलांना खाऊ आणि वह्यांचे वाटप केले. वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करून ढोमे यांनी तरुणांना चांगला आदर्श निर्माण करण्याचे काम केले आहे, असे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नरेश ढोमे यांनी शुभेच्छा देताना व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाला उपसरपंच रामदास ढोमे, चेअरमन रामदास दरेकर, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस नरेश ढोमे, निवृत्ती बोंबे, ग्रामपंचायत सदस्य किशोर दाभाडे, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माऊली ढोमे, भाऊ कोयेमहाले, गोपाळ पोखरकर, विकास दाते, विजय पडवळ, गौरेश दरेकर, सुनील वरे, संजय गावशेते, दत्ता भोर, मुख्याध्यापक पोपट बारहाते, प्रविण गायकवाड, सुभाष कोरडे, दत्तात्रय चिकटे, बाळू बांबळे, पोपट भालेराव, सुनिता फापाळे, मनिषा निचित, मेघा रणसिंग हे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)