पिंपरखेड-जांबूतमध्ये विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील

टाकळी हाजी- जिल्हा परिषद शाळा पिंपरखेड आणि जांबूत केंद्रातील ज्ञानेश्वर नगर आणि इतर अनेक शाळांमध्ये आकाशदिवे, पणत्या आणि कागदाचे दिवे बनवून दिवाळी स्वागताची जोरदार तयारी सुरू झाली आहे.ज्याप्रमाणे बाजारात विविध रंगाचे आकाशदिवे दिसतात, त्यापेक्षाही येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी आकर्षक आकाशदिवे,विविध प्रकारची फुले, रंगीत कागदांच्या पणत्या बनवून कौशल्य विकसित केले आहे. त्यातून त्यांना नवोपक्रम स्वनिर्मितीचा आनंद मिळतो, असे मुख्याध्यापक पोपट बारहाते यांनी सांगितले. ज्ञानेश्वर नगर येथील विद्यार्थ्यांनी अतिशय आकर्षक अशा रंगीत कागदापासून फुलदाणी आणि आकाश दिवे बनवले असल्याचे शिक्षका शोभना गावडे यांनी सांगितले.कोयेमहाले वस्ती शाळा येथे देखील मातीचे किल्ले बनवल्याचे विजय खामकर यांनी सांगितले. पिंपरखेड येथील शिक्षक प्रवीण गायकवाड, सुभाष कोरडे, दत्तात्रय चिकटे, सुनीता फापाळे, मेघा रणसिंग, मनीषा निचित, पोपट भालेराव, बाळू बांबळे, सुप्रिया दाभाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)