पिंच्याक सिल्याट स्पर्धेत मिळविला मानाचा किताब

ओझर्डे – पंजाब येथे इंडियन पिंच्याक सिल्याट फेडरेशनच्यावतीने घेण्यात आलेल्या ऑल इंडिया झोनल स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या संघातील सातारच्या अंशुमन कांबळे याने अंतिम सामन्यात आसामच्या कुमार पेगु याचा पराभव करून “चॅम्पियन ऑफ चॅम्पियन’ हा मानाचा किताब पटकावला. महाराष्ट्र राज्याच्या संघाने सर्वाधिक पदके मिळवून पहिले स्थान मिळवले आहे. विजयी खेळाडूंचे विविध स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.

गुरुनानक युनिव्हर्सिटी पंजाब येथे ऑल इंडिया झोनल पिंच्याक सिल्याट स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत देशातील 31 राज्यातील 370 खेळाडूनी सहभाग घेतला होता. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत महाराष्ट्र संघातील सातारच्या अंशुमन कांबळे यांनी उत्कृष्ट खेळ करत आसामच्या कुमार पेगु याचा पराभव करत चॅम्पियन ऑफ चॅम्पियन हा मनाचा किताब व पंचवीस हजार रुपयेचे बक्षीस मिळवले.

महाराष्ट्र राज्याच्या संघाला सर्वाधिक पदके मिळून प्रथम क्रमांक मिळाला. पिच्याक सिल्याट हा इंडोनेशियन मार्शल आर्ट प्रकारचा खेळ असून तो ष्ट्यडिंग फाईट, तुंगल ग्रुप रेग्यु व गंडा या चार प्रकारात खेळला जातो. हा युवती, महिला, विद्यार्थी यांच्यात स्वसंरक्षणासाठी लोकप्रिय होत आहे. याला युवक कल्याण क्रीडा मंत्रालय भारत सरकार भारतीय विश्‍वविद्यालय संघ व ऑलम्पिक कोन्सिल ऑफ एशियाची मान्यता असून आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक महाराष्ट्र सिल्याट असोसिएशनचे महासचिव किशोर येवले यांचे खेळाडूना मार्गदर्शन मिळाले आहे. विजयी संघातील खेळाडूचे पिच्याक सिल्याटचे अध्यक्ष सुरेंद्र प्रतापसिंग महासचिव किशोर येवले, ऍड. पी. सी.पाटील, मोरेश्‍वर पाटील, मुकेश सोनावणे, प्रकाश पार्टे, शैलेंद्र शेनॉय, विशाल सिंग, नितीन कांबळे, संकेत धामदे, सुनील किंद्रे, संदीप जाधव, योगेश जाधव यांनी अभिनंदन केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)