वाल्हे – वाघेश्वरी विद्यालय पिंगोरी (ता. पुरंदर) मध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. तसेच विद्यालयातील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या शालिनी पवार यांनी सांगितले की, प्रत्येक जण नेहमी शिकत असता. अनेक वेळा समाजाकडून किंवा परिस्थितीनुसार अनुभवाचे शिक्षण मिळत असते याच भान कायम राहणे गरजेचे आहे. कार्यक्रमात वसंत शिंदे, पल्लवी भोसले, राहुल शिंदे, प्रकाश शिंदे, सुनिल शिंदे समवेत विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. टी. हाके यांनी केले. सूत्रसंचालन ए. एस. बनकर यांनी केले तर आभार यु. के. भोई यांनी मानले) कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)