पिंगोरिंच्या पावसामुळे वाल्हेकर जलमय

वाल्हे- पुरंदर तालुक्‍यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या पिंगोरी परिसरात गेली दोन महिने पावसाने सातत्याने हजेरी लावल्याने वाल्हे गावचे ओढे भरून वाहू लागले आहेत. वाल्हे व अडाचीवाडी ही दोन गावे पिंगोरी गावाला लागून आहेत. पिंगोरी गावात मोठया प्रमाणावर जलसंर्वधनाची कामे झाली आहेत व सह्याद्री रांगाच्या डोंगरांचा वसा पिंगोरीस लाभल्याने कोकणातील पावसाच्या धारा पिंगोरीपर्यत पोहचतात. त्यामुळे पिंगोरीत पावसाचे प्रमाण जास्त आहे. वाल्हे परिसरात अद्याप चांगला पाऊस झाला नसला तरीही पिंरोरीच्या पाण्यामुळे ओढ्यांची पाण्याची पातळी वाढली आहे.
पिंगोरी गाव उंचावर असून येथील ओढे अडाचीवाडी व वाल्हे परिसरातून वाहत नीरा नदीला मिळतात. गेल्या दिड महिन्यांपासून ओढ्यातून पाणी वाहत असल्याने वाल्ह्यात पाऊस न पडता ही पिंगोरीचे पाणी गावात पोहचल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. वाल्हे व अडाचीवाडी परिसरात मोठया प्रमाणावर पाणी आडवा पाणी जिरवा प्रकल्पाच्या माध्यमातून ओढ्यावर बंधारे बांधण्यात आले आहेत. पावसामुळे बंधारे भरून वाहू लागले आहेत. यामुळे भुजलपातळीत मोठी वाढ झाली आहे. यावर्षी खरिप हंगाम चांगला झाला असून रब्बीची पिकेही विहिरीच्या पाण्यावर घेता येणार आहेत.
वाल्हे परिसरात मोठया प्रमाणावर वृक्षारोपणाची गरज असून आजही हरणी, दौंडज वेशीवरील डोगंरमाथा व काही परिसर वृक्षारोपणापासून वंचित असल्याने या परिसरात वरूणाची अवकृपा कायम आहे. या परिसरात वक्षारोपण झाल्यास मोठया प्रमाणावर परिसर निसर्गरम्य होउन पर्यटन क्षेत्र बनू शकते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)