पिंगळी कॅनॉल पुलावर अपघाताची शक्‍यता

पुलाचा संरक्षक कठडा तुटल्याने वाहन चालवणे धोक्‍याचे

दहिवडी, दि. 10 (प्रतिनिधी) – राष्ट्रीय महामार्ग मनमाड-सांगली रस्त्यावरील दहिवडी (मोरेमळा) येथील पिंगळी कॅनॉलच्या पुलाचा संरक्षक कठडा एका वाहनाच्या धडकेमध्ये कोसळला आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यातच रस्ता अरुंद असल्याने वाहन चालकांना मोठी कसरत होते. अवजड वाहने दोन्ही बाजूंनी आली तर एका वाहनाला जागीच वाहन थांबावून दुसऱ्या वाहनाला जागा द्यावी लागते. त्यामुळे हा राष्ट्रीय महामार्ग फक्त कागदावरच आहे का..? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या रस्त्यावरून वस्त्रोद्योगामधील मॅंचेस्टर म्हणून ओळखले जाणाऱ्या इचलकरंजी शहराला कच्चा माला पुरवण्यासाठी बारामती, इंदापूर, फलटण, भिगवण या ठिकाणाहून अवजड वाहने वाहतूक करत असतात. तसेच, मायणी, विटा, सांगली या शहरात देखील जाण्यासाठी हा मुख्य रस्ता मानला जातो. या रस्त्याने शेकडो वाहने ये जा करत असतात. तसेच साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाल्याने माळशिरस, फलटण तसेच गोपूज पडळ या कारखान्यांसाठी ऊस वाहतूक ही याच रस्त्याने केली जाते. त्यामुळे हा रस्ता खूप महत्वाचा मानला जातो. तसेच कॉलेज विद्यार्थी आणि जवळच असलेली शाळा, तसेच मंगल कार्यालय यामुळे याठिकाणी रहदारी मोठ्या प्रमाणावर असून ते या पुलाचा वापर करतात. त्यामुळे याची दुरुस्ती तात्काळ होणे गरजेचे होते. मात्र, याकडे बांधकाम विभाग लक्ष्य देत नसल्याने नागरिकांमध्ये मोठी नाराजी पहायला मिळत आहे. याठिकाणी मोठे अपघात घडण्याची शक्‍यता आहे. बांधकाम विभागाने याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)