पाहतच रहावे असे भोसरीतील देखावे

पिंपरी – भोसरी, दिघी रोड आणि आळंदी रोड परिसरातील देखावे यंदाही अतिशय उत्कृष्ट ठरत आहेत. पाहतच रहावे, असे देखावे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी साकारले आहेत. पौराणिक प्रसंगावर आधारित हलत्या देखाव्यांवर यंदा मंडळांनी भर दिला आहे. हलत्या देखाव्यांना ध्वनी आणि प्रकाशाच्या उत्तम अशा संयोजनाने अतिशय थरारक असे बनवले आहे.
काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या भव्य असे महल साकारण्यात आले आहेत. तर काही मंडळांनी सामाजिक कुरीती आणि शिक्षणाच्या व्यापरीकरणावरही आपल्या देखाव्याच्या माध्यमातून बोचरी टीका केली आहे.
या परिसरामध्ये गजमहल, जयपुर महल, रोमन पॅलेस, त्रिशूल महल, पुष्प महल असे भव्य देखावे पहावयास मिळत आहेत. खंडोबाचा महिमा, नृसिंह अवतार, ज्वालासुराचा जन्म व मृत्यू, बाबा अमरनाथ कथा, कवंध राक्षसवध अशा पौरोणिक प्रसंगावर आधारित देखावे वातावरण भक्‍तिचैतन्याचा संचार करत आहेत. तसेच संत ज्ञानेश्‍वर माऊलींचे जीवनचरित्र, शिवराज्याभिषेक सोहळा, दुर्ग संवर्धन असे आदर्श घेणारे देखावे देखील नागरिकांना खिळवून ठेवतात. तसेच शिक्षणाचा बाजार, व्यसनाधीन झालेली तरुणाई, तरुणांची दिशा व दुर्दशा असे देखावे डोळ्यात अंजन घालण्याचे काम करत आहेत. याशिवाय लेझर शो आणि काळाच्या ओघात हरवत चाललेल्या कठपुतली (बाहुल्यांचा) खेळाला देखील मंडळांनी आपल्या देखाव्यांमध्ये स्थान देऊन या परिसरात देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना एक पर्वणीच देऊ केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)