पासिंग रखडले; पीएमपीच्या 33 बसेस डेपोतच

पुणे- फक्‍त पासिंग झाले नाही, हे किरकोळ कारण सांगत सुमारे 33 बसेस अजूनही पीएमपी डेपोबाहेर आल्या नसल्याचे समोर आले आहे.

पीएमपीच्या सुमारे 33 बसेसची पासिंग संपलेली असून नव्याने पासिंगसाठी देखभाल-दुरुस्ती, आसनव्यवस्था, काचदुरुस्तीची सर्व कामे पूर्ण आहेत. मात्र, केवळ आरटीओकडून करण्यात येणाऱ्या पासिंगसाठी बसेस मार्गावर येत नसल्याने प्रवाशांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, नुकत्याच प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) मनुष्यबळाअभावी पासिंगचे काम रखडले असल्याचे सांगण्यात येत आहे.

-Ads-

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात स्वतःच्या मालकीच्या 1300 पेक्षा जास्त बस आहेत. दरवर्षी नव्याने बसची आरटीओ कडून पासिंग करून घेणे बंधनकारक आहे. पीएमपीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या पाहता बसची संख्या अपुरी आहे. यामुळे अनेक वेळा प्रवाशांना बसची वाट पाहत स्थानकावर उभे राहवे लागत असल्याचे चित्र आहे. तसेच या महिन्यात (ऑक्‍टोबर) आणखी 150 बसेस पासिंगसाठी पाठविण्यात येणार आहेत. मात्र, यातील काही बस पासिंगअभावी रखडण्याची शक्‍यता असल्याची माहिती पीएमपीतील अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, काही महिण्यापूर्वी उच्च न्यायालयाने परिवहन निरिक्षकाने एका दिवशी किती बस पासिंग करता येईल याचे बंधन टाकले आहे. त्यातच वाहन तपासणीत हलगर्जी पणा केल्यामुळे नुकतेच पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील 17 निरीक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. यामुळे अन्य अधिकाऱ्यांवर कामाचा ताण आला आहे.

पासिंगसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी पूर्ण करण्यात आल्या आहेत. सध्या 33 बस रखडल्या असून येत्या काळात आणखी संख्या वाढणार आहे. यासंदर्भात प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधून लवकरच तोडगा काढण्यात येईल.
– नयना गुंडे, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
3 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)