“पासिंग टेस्ट’मध्ये सरासरी तीन टक्‍के वाहने “फेल’

पिंपरी – पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत (आरटीओ) वाहनांच्या “फिटनेस टेस्ट’मध्ये सरासरी तीन टक्के वाहन “फेल’ झाली आहेत. 1 ते 31 ऑक्‍टोबर दरम्यान घेतलेल्या 3 हजार 68 वाहनांच्या तपासणीत ही बाब आढळली आहे.

आरटीओमध्ये चालणाऱ्या वाहनांच्या पासिंगच्या कामात त्रुटी असल्याची भूमिका घेऊन श्रीकांत कर्वे यांनी कोर्टात याचिका केली होती. यावरील सुनावणीत आरटीओ कार्यालयांमध्ये मीटरचे “ब्रेक टेस्टिंग ट्रॅक’ उभारण्याचे आदेश हायकोर्टाने दिले होते. त्याची मुदत 31 ऑक्‍टोबर 2017 ला संपली. मात्र, वाहन “पासिंग’चे काम बंद पडू नये, यासाठी परिवहन आयुक्तालयाने अशा आरटीओतील “पासिंग’ची कामे “टेस्टिंग ट्रॅक’ उपलब्ध असलेल्या जवळच्या आरटीओ कार्यालयात करण्याचा निर्णय घेतला.

पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात यापूर्वी सरासरी 125 वाहनांचे दररोज पासिंग केले जात होते. आता पिंपरी-चिंचवड आरटीओच्या मोशी येथील नवीन ट्रॅकवर कामकाज वर्षभरापूर्वी सुरु करण्यात आले आहे. आरटीओच्या नियमानुसार मोटार निरीक्षकांना कामाचा कोटा निश्‍चित करून दिला आहे. त्यानुसार कार्यवाही केली जात आहे. या ट्रॅकवर दररोज सुमारे 20 ते 25 वाहनांची तपासणी केली जात आहे. सध्या या ट्रॅकवर पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरासह मावळ, खेड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर, हवेली मुळशी या तालुक्‍यांचा समावेश असलेल्या कार्यक्षेत्रातील वाहनांची योग्यता तपासणी केली जात आहे.

“पासिंग’साठी “ऑनलाइन बुकिंग’ आणि पैसे भरण्याची पद्धत सर्वप्रथम पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे वाहन मालकाला फक्त चाचणीसाठी “आरटीओ’त यावे लागत आहे. इतर औपचारिकता पूर्ण करावी लागणार नसल्याने चालक व कर्मचारी दोघांना ते सोईचे ठरत आहे.

ही वाहने ठरली चाचणीत फेल
वाहनाचा प्रकार संख्या
1) तीन चाकी – 16
2) बस- 16
3) माल वाहतूक वाहन- 54
4) ऍम्बुलन्स- 02
5) मोटार कॅब – 05
एकूण 93

राज्यात 30 हजार 709 वाहनांची “टेस्ट’
राज्यातील सर्व प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत ही वाहन योग्यता तपासणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार मोटार वाहन निरिक्षकाला वाहन तपासणीसाठी ठराविक वेळ गृहीत धरण्यात आला आहे. राज्यभरात 1 ते 31 ऑक्‍टोबरदरम्यान एकूण 30 हजार 709 वाहनांची तपासणी करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)