पासपोर्ट प्रक्रियेतील सुलभता दिलासादायक (भाग-२)

पासपोर्ट प्रक्रियेतील सुलभता दिलासादायक (भाग-१)

एरव्ही अन्य कागदपत्रे तयार करण्याच्या तुलनेत पासपोर्ट तयार करण्याचे काम कठिण आणि अवघड असते, हे सर्वांनाच ठाऊक आहे. रेशनकार्ड, पॅनकार्ड, आधार कार्डच्या तुलनेत पासपोर्ट तयार करण्याची प्रक्रिया किचकट मानली जाते. कारण पासपोर्टचा संबंध थेट राष्ट्रीय सुरक्षेशी जोडला जात असल्याने पासपोर्ट हे संवेदनशील कागदपत्र मानले जाते. याशिवाय दलाल मंडळी पासपोर्टसाठी मोठ्या प्रमाणात कमीशन काढण्याचे काम करत असतात. लोकांकडे वेळ कमी असतो किंवा माहितीचा अभाव असल्याने काही मंडळी पासपोर्ट काढण्यासाठी वाट्टेल तेवढे पैसे देण्यासाठी तयार असतात. याचा फायदा बेकायदा काम करणारी मंडळी आणि दलाल घेतात. म्हणून सामान्य नागरिकांना समजेल, अशा स्वरूपात अर्ज भरण्याची प्रक्रिया केली आहे. ऑनलाईनवर अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने कार्यालयीन कामकाजातील अडचणींपासून वाचण्याची संधी नागरिकांना मिळत आहे.

पासपोर्ट सेवा केंद्राकडून दिल्या जाणाऱ्या सुविधांमुळे गेल्या काही वर्षात पासपोर्ट तयार करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. एका आकडेवारीनुसार 2017 मध्ये पासपोर्टसंबंधी सेवेत 29 टक्‍क्‍यांनी वाढ नोंदली गेली आहे. विशेष म्हणजे गावात पासपोर्ट कार्यालय नसतानाही पासपोर्ट काढणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. अर्थात पासपोर्ट मेळाव्याचे आयोजन करून अर्ज लवकरात लवकर निकाली काढण्याचे प्रयत्न केले जातात. असे असताना जर प्रत्येक मतदारसंघात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू झाल्यास या कामाला आणखीच गती येईल आणि अडथळे दूर होतील. पासपोर्ट कागदपत्र महत्त्वपूर्ण असले तरी ते सामान्यांना समजेल अशा रितीने त्याची रचना असायला हवी. सरकारच्या नव्या घोषणांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना पासपोर्ट काढणे सोपे जाईल, अशी अपेक्षा करू या.

– जगदीश काळे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)