पासपोर्ट प्रक्रियेतील सुलभता दिलासादायक (भाग-१)

गेल्या काही वर्षात पासपोर्ट (पारपत्र) तयार करण्याची प्रक्रिया खूपच सुटसुटीत आणि सोपी करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले गेले. यात अर्ज करणे आणि पडताळणी नियम खूपच सोपे झाले आहेत. पूर्वी पडताळणीसाठी कागदपत्रांची जंत्रीच मागवली जात असते. आता मात्र तीन कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट काढणे शक्‍य झाले आहे. आधार कार्ड, ओळखीसासाठी पॅन कार्ड, जन्मतारखेचा दाखला आणि पत्त्याचा पुरावा. विशेष म्हणजे ऑनलाइन अर्ज करण्याची व्यवस्था झाल्यानंतर अपॉइंटमेंट निश्‍चित करणे देखील सुटसुटीत झाले आहे. आपल्या सोयीनुसार वेळ घेता येते. म्हणूनच बहुतांश मंडळींसाठी पासपोर्टसाठी अर्ज करण्याचे काम सोपे झाले आहे. असे असले तरी पासपोर्ट सेवा केंद्राचे जाळे काही शहरांपूरतीच मर्यादित असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना अजूनही पासपोर्ट काढणे म्हणजे संकट वाटते. परंतु सरकार ही अडचण देखील दूर करणार असून देशातील सर्वच मतदारसंघात पासपोर्ट सुविधा केंद्र सुरू केली जाणार आहेत.

काही वर्षांपासून पासपोर्ट तयार करण्याची प्रक्रिया सोपी करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. यात ऑनलाईन अपॉइंटमेट मिळवण्यासाठी करण्यात येणारा अर्ज सोपा केला आहे. मात्र अजूनही अशा काही अडचणी येत आहेत की, त्या कारणामुळे पासपोर्ट तयार करणे ही कठीण बाब मानली जाते. यापैकी एक म्हणजे ठराविक शहरात असणारे पासपोर्ट कार्यालय. यासाठी अनेकांना पासपोर्ट तयार करण्यासाठी बरेच अंतर कापावे लागते. अनेक वेळा तर पासपोर्टसाठी दोन-तीन चकरा माराव्या लागतात. म्हणून अर्जदाराला बराच त्रास सहन करावा लागतो. नागरिकांना होणारा हा त्रास लक्षात घेता सरकारने यादृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अमलबजावणी झाल्यास पासपोर्ट मिळवणे खूपच सोपे होणार आहे.

पासपोर्ट प्रक्रियेतील सुलभता दिलासादायक (भाग-२)

सरकारच्या नव्या निर्णयानुसार येत्या मार्चपर्यंत देशातील सर्व 543 मतदारसंघात पासपोर्ट सेवा केंद्राची उभारणी केली जाणार आहे. न्यूयॉर्क येथील भारतीय वाणिज्य दूतावासातील पासपोर्ट सेवा कार्यक्रमात परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के सिंह यांनी यासंदर्भात माहिती दिली आणि देशातील प्रत्येक पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट केंद्र सुरू करण्याची योजना असल्याचे सूतोवाच केले. तसे पाहिले तर भारतीय नागरिक मग तो देशातील असो किंवा परदेशातील असो, त्याला पासपोर्ट मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे.

– जगदीश काळे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)