पासपोर्टसाठी जिल्हावासियांच्या उड्या! 

नागरिकांचा उंदड प्रतिसाद : 4 हजार जणांनी घेतला लाभ

नगर – जिल्हावासियांसाठी प्रधान डाकघरातील इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर भारत सरकारच्या विदेश विभागामार्फत पासपोर्ट अर्थात पारपत्र कार्यालय 31 मार्च रोजी सुरू करण्यात आले. या कार्यालयात गेल्या चार महिन्यांपासून जिल्ह्यातील चार हजार नागरिकांनी लाभ घेतला आहे. पासपोर्टसाठी नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. या सुविधेमुळे पुणे येथे होणारे नागरिकांचे हेलपाटे थांबले आहे. वेळ, पैसा अनाठायी खर्चात बचत होत असल्याने नागरिकांनाही दिलासा मिळाला असून, पासपोर्टसाठी पारपत्र कार्यालयात जिल्हावासियांच्या उड्या पडत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी केल्यानंतर पासपोर्ट सेवा केंद्रात कागदपत्रांची पडताळणी करण्यात येते. मागील चार महिन्यांच्या कालावधीत सुट्टीचे दिवस वगळता प्रत्येक दिवशी मुलाखतीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या कागदपत्रांची पडताळणी या कार्यालयात होत आहे. रोज साधारणपणे पन्नास लोकांना मुलाखतीसाठी बोलवले जाते. या अवधीमध्ये एकूण 3 हजार 855 नागरिकांनी या सेवा केंद्राचा लाभ घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. मागील दोन दशकांच्या काळात या संख्येचा आलेख वाढत गेला आहे.

परदेशवारीसाठी पारपत्र अर्थात पासपोर्ट आवश्‍यक असतो. भारत सरकारच्या विदेश मंत्रालयामार्फत राज्यात मोठ्या शहरातच मोजकी कार्यालये सुरू होती. त्यामुळे या विभागीय कार्यालयापर्यंत पासपोर्ट मिळवण्यासाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागत. यामुळे जिल्हास्तरावर पारपत्र कार्यालय सुरू करावे, अशी मागणी नागरिकांतून होत होती. या पार्श्‍वभूमीवर 2014 मध्ये केंद्रात सत्तारूढ झालेल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जिल्हास्तरावर पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला.

नागरिकांची मागणी लक्षात घेऊन नगर येथे प्रधान डाकघर इमारतीत पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला. नगर येथील डाकघर पासपोर्ट सेवा केंद्राचा विधिवत शुभारंभ 31 मार्च 2018 रोजी लोकसभा सदस्य दिलीप गांधी व सदाशिव लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आला. यावेळी शहराच्या प्रथम नागरिक महापौर सुरेखाताई कदम, विदेश विभागाचे सचिव डॉ. ज्ञानेश्‍वर मुळे, पुणे क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालयाचे अधिकारी अनंत ताकवाले, नगर डाकघराचे वरिष्ठ अधीक्षक जालिंदर भोसले यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डाकघर पासपोर्ट सेवा केंद्राचे काम संचालक रवी कुमार सिन्हा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, त्यासाठी सहाय्यक अधिकारी म्हणून संजय बोंदर्डे व वासंती नगरकर या कार्यरत आहेत.

देशाबाहेर जाणाऱ्यांची वाढली वर्दळ

अत्याधुनिक शिक्षणाच्या कालखंडात उच्च शिक्षण घेऊन देशाबाहेर जाणाऱ्या नागरिकांची तसेच उद्योगाच्या विस्तारलेल्या कक्षामुळे कामानिमित्त, शिक्षणानिमित्त व व्यवसायानिमित्त देशाबाहेर जाणाऱ्यांची वर्दळ वाढली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)