पाषाण तलावाला जलपर्णीचा विळखा

पुणे : पाषाण तलाव हे पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. अनेक विदेशी पक्षांचा वावर या तलावाजवळ असतो. मात्र, ड्रेनेजचे पाणी सोडले जात असल्यामुळे तलावातील पाणी प्रदूषित होऊन याठिकाणी जलपर्णींचे प्रमाण वाढले आहे. याकरिता रामनदीच्या उगमापासून पात्रापर्यंतचा भराव, राडारोडा काढून लहान झरे खुले करून पाणी प्रवाहित करणे आवश्‍यक आहे. तसेच, नदीला मिळणारे ओढेही रूंद करणे आवश्‍यक आहे.

मात्र, याठिकाणी जलपर्णी काढण्यासाठी केवळ एकाच बाजूने जावे लागते. त्यामुळे कामाचा वेग कमी असतो. परिणामी, जलपर्णी लवकर वाढतात. तलावात उतरता यावे, यासाठी उद्यान विभागाकडे रॅम्प उपलब्ध करून देण्याची मागणी आरोग्य विभागाने केल्याची माहिती विभागाच्या डॉ. कल्पना बळीवंत यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)