पावसासाठी माळेगावात सामुहिक प्रार्थना

माळेगाव- सध्या पावसाने दडी मारली असून तो लवकर व भरपूरप्रमाणत पडावा यासाठी हिंदू-मुस्लिम बांधवांच्या वतीने सामुहिक प्रार्थना करण्यात आली. माळेगाव येथील मुस्लिम बांधवाना पंचायत समितीचे सभापती संजय भोसले यांच्या वतीने इफ्तार पार्टी देण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अविनाश तावरे, सुभाष साठे, नितीन तावरे, संजय रासकर, सदानंद भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी हिंदू-मुस्लिम बांधवांच्या वतीने पावसासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. यावेळी मौलाना अब्दुल अहाद खान, शौकत शेख, शकिल सय्यद, रियाज शेख, जावेद महात, सलिम पठाण, रियाज सय्यद, सिराज मेटकरी व बहुसंख्य मुस्लिम बांधव उपस्थित होते.
दरम्यान माजी सरपंच जयदीप दिलीप तावरे यांनी स्वतःच्या घरी मुस्लिम महिला व पुरुषांसाठी इफ्तार पार्टी दिली. विशेषतः तालुक्‍यात प्रथमच खास करुन मुस्लिम महिलांसाठी इफ्तार पार्टी चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभापती संजय भोसले, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संभाजी होळकर, उद्योजक रवींद्र काळे, दत्तात्रय येळे, दिलीप तावरे, धनवान वदक आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादीचे युवा नेते रविराज तावरे यांनी देखील दरवर्षीप्रमाणे मुस्लिम बांधवांना इफ्तार पार्टी दिली. या इफ्तारचे नियोजन संदिप आढाव, दादा जराड, सलिम पठाण आदी कार्यकर्त्यांनी केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)