पावसाळ्यात ‘या’ वस्तू ठेवा सतत सोबत

पावसाळ्यात घराबाहेर पडताना हजार गोष्टींचा आपण विचार करतो त्यात पाऊस आपल्याला कधी, केव्हा गाठेल हे सांगता येत नाही. अशा वेळी आपल्या बॅगमध्ये काही अत्यावश्‍यक वस्तू असणे आणि वापरत्या वस्तूंमध्ये थोडा बदल करणे अत्यंत गरजेचे असते.

* फुटवेअर : पावसाळ्यामध्ये सॅंन्डल्स घालणे सर्वात उत्तम ठरते. कारण यामुळे कपड्यांवर पाण्याचे शिंतोडे उडत नाहीत. तसेच आपल्यासोबत एक जास्तीची फुटवेअरची जोडी ठेवावी. कारण पाण्यातून किंवा चिखलातून चालताना चप्पल तुटू शकते. अशा वेळी एक जोडी असेल तर ती ताबडतोब घालता येते.

* वॉपरफ्रूट मेकअप : पावसाळा असला म्हणजे चार महिने मेकअप करायचा नाही असे होत नाही. त्यामुळे पावसाळ्यात वॉटरप्रूफ सौंदर्य प्रसाधने वापरावीत. खास करून मस्कारा, लिपबाम, लिपग्लॉस, सनसिक्रन आणि मॉईश्‍चरायझरमध्ये बदल करावा.

* फोल्डेबल छत्री : अशा प्रकारची छत्री ही अगदी हॅंडी असते आणि बॅगमध्ये ठेवून ती सहजपणे कुठेही नेता येते. अर्थात ही छत्री स्टायलीश असावी याकडे लक्ष द्यावे.

* कॉम्पॅक्‍ट रेनकोट : पारदर्शक वॉटरप्रूफ रेनकोट सहजपणे गाडीच्या डिकीत किंवा बॅगेत ठेवता येऊ शकतो. असा रेनकोट पावसाळ्यात नेहमीच सोबत ठेवावा.

* वेट वाईप्स आणि फेसवॉश : पावसातून एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर चेहरा पुसण्यासाठी नेहमी बरोबर वेट वाईप्स ठेवावे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)