पावसाळ्यात ट्रेक करताय, तर या खास टिप्स तुमच्यासाठी

सध्या पावसाला सुरू आहे. या काळात ट्रेकिंगला जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. अशा वेळी खाली दिलेल्या स्पेशल टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. कोणतीही ट्रिप ट्रेक आपल्या जीवनापेक्षा मोठा महत्वाचा नाही हे लक्षात राहू द्या. फक्त मित्र-मैत्रिणी जात आहेत म्हणून त्याच्याबरोबर जाऊ नका.

* पावसाळ्यात ट्रेकिंग करताना लीडर व इतर सहभागी नागरिकांनी टॉर्च जवळ ठेवावा.
* ओढे, नाले ओलांडताना वाढत्या पाण्याचा, त्याच्या वेगाचा व गढूळपणाचा अंदाज घ्या. स्थानिक लोक जेथून ओढे/नाले ओलांडतात तेथूनच ते ओलांडा.
* कातळ, दगड-गोटे हे शेवाळलेले/बुळबुळीत असल्याने कोणीही झपकन घसरू शकतो/प्रवाहात पडू शकतो. त्यामुळे सावध रहा.
* धबधब्यांवरील पाणलोट प्रवाहांची तुम्हाला माहिती नाही अशा धबधब्यात भिजू नका. वरच्या प्रवाहात माणसं/जनावरांचा वावर असल्यास सुटे दगड-गोटे वाहून येऊन डोक्यात पडू शकतात.
* भूस्खलन झाले असेल तर त्या ढिगाऱ्यापासून दूर रहा.
* किल्ल्यावर/ लेण्यात राहताना एखादाच निवारा असेल तर रात्रीच्या निवाऱ्यासाठी जास्तीत जास्त लोकांना सामावून घ्या.
* फक्त ट्रेकच्या जाहिराती बघून निर्णय घेऊ नका. नेणारी संस्था, व्यक्ती किती अनुभवी आहे याची खात्री करून घ्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)