पावसामुळे पालेभाज्यांची आवक घटली : कोथिंबीर पुन्हा महागली

दर्जाहीन मालाचे प्रमाण वाढले

पुणे, दि. 27 – जिल्ह्यासह विभागात सुरू असलेल्या पावसाचा परिणाम पालेभाज्यांच्या आवकेवर झाला आहे. मार्केट यार्डातील पालेभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत निम्म्याने घटली आहे. येथील घाऊक बाजारात रविवारी कोथिंबिरीची 1 लाख जुडी, तर मेथीची 50 हजार जुडी आवक झाली आहे.

बाजारात आलेल्या भाज्यांमध्ये खराब आणि दर्जाहीन मालाचे प्रमाण अधिक आहे. दर्जेदार पालेभाज्यांचा भाव मिळत आहे. कोथिंबिरीच्या भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेत शेकडा जुडीमागे 400 रुपयांनी वाढ झाली आहे. तर मेथीचे वाढलेले भाव कमी झाले आहेत. मेथीच्या भावात शेकडा जुडीमागे 400 रुपयांनी घसरण झाली आहे. कांदापातच्या भावातही शेकडा जुडीमागे 100 ते 200 रुपयांनी घट झाली आहे. उर्वरित पालेभाज्या गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली आहे.

पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : 500-1000, मेथी : 500-800, शेपू : 300-500, कांदापात : 500-1000, चाकवत : 400-500, करडई : 400-500, पुदिना : 300-500, अंबाडी :500-600, मुळे : 500-1000, राजगिरा : 400-500, चुका : 500-700, चवळई : 400-700, पालक : 600-700.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)