पावसामुळे कांदा रोपे गेली वाहून

दावडी- खेड तालुक्‍यामधील पूर्व भागातील दावडी, निमगाव, खरपुडी, रेटवडी या परिसरात मंगळवारी (दि. 1) ढगांच्या गडगडासह मुसळधार पाऊस बरसला. दुपारच्या सुमारास सुमारे एक तास सुरू असल्याने पावसाने शेतकऱ्यांची धावपळ उडाली. सध्या या परिसरात शेतामध्ये कांदा लागवड सुरू असून अचानक आलेल्या पावसामुळे लागवड केलेली कांदा रोपे वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. गेल्या महिन्यापासून या परिसरात पावसाने दडी मारली होती त्यामुळे विहिरीची पाणी पातळीत घट झाली होती त्यामुळे शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत होता. त्यातच मंगळवारी आलेल्या पावसाने शेतात पाणी पाणी झाले असून ओढे-नाले तुडुंब भरुन वाहिल्याने शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)