पावसाने रब्बीच्या आशा पल्लवीत, पण पिकांचेही नुकसान

पुणे – दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. द्राक्षे, कांदा डाळिंब पिकांचे मोठे नुकसान काही भागांत झाल्याचे समोर आले असून काही भागांत मात्र या पावासाने कोरडे बंधारे पुन्हा भरल्याने रब्बीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात अनेक भागांत ढगाळ हवामान आहे. सोमवारपासून काही भागात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. सोमवारी मध्यरात्रीपासून हवामानात बदल झाला आहे. त्यानंतर मंगळवार आणि बुधवारपर्यंत टप्याटप्याने अनेक भागांत मुसळधार होत आहे. त्यात कोल्हापूर, सातारा, बीड आणि नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस पडला आहे. पुणे जिल्ह्यातही अनेक भागांत पाऊस झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, शिरोळ तालुक्‍यांना गेल्या दोन दिवसांपासून सतत पावसाचा तडाखा बसत आहेत. साताऱ्यातील दुष्काळी पट्ट्यात माण-खटाव, फलटण येथे पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर, धुळे जिल्ह्यातील काही भागांत हलका व मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला, तर उर्वरित भागांत ढगाळ हवामान होते. यामुळे पिकांवर रोग व किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्‍यातील चापानेर, टाकळी राजेराय, जालना जिल्ह्यातील वरूड, बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्‍यातील सौताडा, उस्मानाबादमधील ईट, अणदूर, नळदूर्ग, भूम परिसरात मंगळवारी पहाटेपासून पाऊस सुरूवात झाला. या भागात सकाळीही पावसाच्या हलक्‍या सरी बरसल्या. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड, नांदेड, लोहा परिसरातही पावसाच्या सरी झाल्या. त्यामुळे रब्बी हंगामातील ज्वारी पिकाला काही प्रमाणात दिलासा मिळाला. या पावसामुळे भाजीपाला, डाळिंब, द्राक्षे या पिकांना चांगलाच फटका बसला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)