व्हिडिओः पावसाने मुंबईकरांची दाणादाण, रस्ते आणि रेल्वे वाहतूक पूर्ववत

मुंबई – मुसळधार पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडाली आहे. रात्री ओसरलेला पाऊस पुन्हा सकाळी सुरू झाला. विशेष म्हणजे आजही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. मात्र काल दुपारपासून ठप्प असलेली मुंबईची लाईफलाईन अखेर पुन्हा सुरु झाली आहे. मध्य, हार्बर, पश्‍चिम रेल्वे सुरु असून रेल्वे गाड्या काहीशा उशिराने धावत आहेत.

रस्ते वाहतूकही पुन्हा सुरळीत होत आहे. मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस वे पुन्हा सुरु झाला आहे. मात्र सकाळपासून पावसाचा जोर वाढल्याने आजही मुंबईच्या रस्त्यांवर पाणीच पाणी पाहायला मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)