पावसाने बाजरी पिकाचे नुकसान

अवसरी- आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व पट्ट्यात शनिवारी (दि. 13) झालेल्या अवकाळी पावसाने शेतकरी बांधवांची त्रेधात्रिपाट उडाली. दुपार पासूनच हवामानात बदल जाणवत होता. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मेघ गर्जनेसह अवसरी बुद्रुक, गावडेवाडी, अवसरी खुर्द, पिंपळगाव व भराडी आदी भागात तुरळक पाऊस पडला. तर अनेक भागात मेघ गर्जनेसह पाऊस झाला. तालुक्‍यातील अनेक गावात कांदा काढणीचे काम सुरू होते. पावसामुळे कांद्यांचे नुकसान झाले आहे. कांदा भिजू नये म्हणून शेतकऱ्यांनी कांदा शेतात झाकून ठेवला. काही भागात फुलोऱ्यात आलेली बाजरी पीक पडून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)